दुचाकी निष्काळजीपणाने चालवून स्वतःच्या मृत्यूस व अन्य एकास जखमी केल्याप्रकरणी रुजाय पिंटो, वय ६०, रा. टिळकवाडी (बेळगाव), कर्नाटक यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : दुचाकी निष्काळजीपणाने चालवून स्वतःच्या मृत्यूस व अन्य एकास जखमी केल्याप्रकरणी रुजाय पिंटो, वय ६०, रा. टिळकवाडी (बेळगाव), कर्नाटक यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ मार्च रोजी ३ वाजण्याच्या दरम्यान लिंब, ता. सातारा गावच्या हद्दीत गौरीशंकर कॉलेज समोर रुजाय पिंटो यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक के. ए. २२ एच. के. ००६३ निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून दुचाकी घसरून ती डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात स्वतःच्या मृत्युस कारणीभूत ठरून त्यांचा भाऊ जेव्हिहर पिंटो यांना अपघातात जखमी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


