फडतरवाडी, ता. सातारा येथे विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : फडतरवाडी, ता. सातारा येथे विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. २८ मार्च रोजी १० वाजण्याच्या दरम्यान फडतरवाडी येथे दरे नावाच्या शिवारात स्वाती सुनील अंभोरे, वय ४० रा. फडतरवाडी ही महिला ऊसतोड करण्यासाठी गेली होती. तिच्या मुलाला तहान लागल्याने ती जवळ असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता विहिरीत पडून तिचा मृत्यू झाल्याची खबर पती सुनील संपत अंभोरे याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.


