Satara

esahas.com

शहरात चोरट्यांकडून महिला होताहेत टार्गेट

सातारा शहरात चोरट्यांकडून महिला टार्गेट होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वॉकींग करत असलेल्या महिलेचा मोबाईल व त्याच्या कव्हरमध्ये असलेली रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेली असून सलग घटना घडत असल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अभिनेत्री गजानन खंडागळे (वय 38, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

esahas.com

औंध पोलिस स्टेशनचे पाच पोलीस निलंबित

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाच दरोडेखोर औंध पोलिस स्टेशनचे लॉकअप सोडून पळाले होते. या प्रकरणातली कर्तव्य कसूरी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना भोवली आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी निलंबित केले आहे.

esahas.com

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 138 कोटी रुपयांचा करोत्तर नफा

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2021- 22 या आर्थिक वर्षाअखेर 138 कोटी 17 लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ नफा हा 67 कोटी रुपये असून राखीव निधीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

बुद्धगयाच्या दर्शनाने २८ महिलांनी घेतली श्रामणेरी दिक्षा

प्रज्ञा-शील-करुणा म्हणजे बुद्ध मार्ग होय. या मार्गावर जाण्यासाठी मनाची एकाग्रता व मशागत करावी लागते. त्यामुळे बुद्ध की और जाण्यासाठी तयार झालेल्या महाराष्ट्रातील २८ माता-भगिनींनी चक्क श्रामणेरी दिक्षा घेऊन आपली मनोकामना पूर्ण केली आहे. त्यामध्ये सायगाव ता जावळी जि सातारा येथील श्रामणेरी सुजाता तथा सौ वंदना अरुण जगताप यांचा समावेश आहे.

esahas.com

शिवछत्रपतींचे विचार देशभर रुजविणे हेच आद्य कर्तव्य : देसाई

शिवसमर्थांच्या ऐतिहासिक भेटीचे महत्त्वाचे ठिकाण शिंगणवाडी हेच असल्याने, याच चाफळ खोऱ्यातून शिवाजी महाराजांचे विचार देशभर पोहोचविले जाण्याचा व मनामनात रुजविण्यासाठी कार्य करण्याचा आग्रह गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. वैशाख शुद्ध नवमीला शिंगणवाडीत शिवसमर्थ प्रेरणादिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

esahas.com

‘अजिंक्यतारा' राज्य संरक्षित किल्ला घोषित करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यासोबत बैठक

सातारा शहराजवळ असलेल्या अंजिक्यतारा किल्ल्याला पुरातन इतिहास आहे, परंतु काळाच्या ओघात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित किल्ल्यामध्ये येत नसल्यामुळे दुर्लक्षित झाला आहे व त्यामुळे त्याचे संवर्धन होत नाही, तरी हा किल्ला राज्यसंरक्षित किल्ला म्हणून घोषित करावा

esahas.com

आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पत्नी सोनिया गोरे यांच्यावर गुन्हा

माण-खटावचे विद्यमान भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांची पत्नी सोनिया गोरे, अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम व महंमद फारुख खान यांच्यावर विविध कलमान्वये वडूज येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या महिनाभरातील भाजपा आमदार यांच्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ झाली आहे.

esahas.com

बुध येथे कांद्याची एैरण जळून खाक, सुमारे लाखाचे नुकसान

बुध (करंजओढा), ता. खटाव गावच्या हद्दीत चावर नावाच्या शिवारात अरविंद शंकर बोराटे (वय ५५, रा बुध [करंजओढा]) यांच्या शिवारातील दोन कांदयाच्या ऐरणीस रात्री लागलेल्या आगीत कांद्याची ऐरण जळून खाक झाली.

esahas.com

शाहूनगरमध्ये वृध्द महिलेची फसवणूक

सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा पायथ्याशी असलेल्या नलवडे कॉलनी, शाहूनगरमध्ये वृध्द महिलेला अनोळखी दोघांनी फसवणूक करत हातचलाखीने 5 तोळे सोन्याचा ऐवज चोरुन नेला. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

महिला पोलीसाला जाचहाट करणाऱ्या साताऱ्यातील सहा जणांवर गुन्हा

पुणे शहरात महिला फौजदार म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या प्रियांका निकम यांनी पतीसह एकूण ६ जणांवर जाचहट, फसवणूक व गळा दाबल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अधिकार्‍याच्या या तक्रारीने खळबळ उडाली आहे.