maharashtra

शहरात चोरट्यांकडून महिला होताहेत टार्गेट

अजंठा चौक रोडवर महिलेच्या मोबाईलसह रोख रक्कम लांबवली

In the city, women are being targeted by thieves
सातारा शहरात चोरट्यांकडून महिला टार्गेट होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वॉकींग करत असलेल्या महिलेचा मोबाईल व त्याच्या कव्हरमध्ये असलेली रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेली असून सलग घटना घडत असल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अभिनेत्री गजानन खंडागळे (वय 38, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सातारा : सातारा शहरात चोरट्यांकडून महिला टार्गेट होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वॉकींग करत असलेल्या महिलेचा मोबाईल व त्याच्या कव्हरमध्ये असलेली रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेली असून सलग घटना घडत असल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अभिनेत्री गजानन खंडागळे (वय 38, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 10 रोजी रात्री गोडोली नाका ते अजंठा चौक रोडवर महिला फोनवर बोलत वॉकींग करत असताना दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. अंधाराचा गैरफायदा घेत महिलेचा फोन संशयितांनी जबरदस्तीने हिसकावला. या घटनेनंतर महिला अलर्ट झाली व त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी ताकदीच्या जोरावर मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला.
या घटनेने महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. महिलेच्या मोबाईलला कव्हर होता व त्या कव्हरमध्ये 1020 रुपये होते. मोबाईलसोबत पैसेही चोरी झाले. घटनेनंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला.
दरम्यान, दि. 10 रोजी सांयकाळी शाहूनगर येथे पोलिस असल्याचे खोटे सांगून वृध्द महिलेचे 5 तोळे सोने हातचलाखीने चोरी झाले होते. त्यानंतर लगेचच रात्री मोबाईल चोरीची घटना घडली आहे. यामुळे अवघ्या तीन तासात या चोऱ्या झाल्या असल्याचे समोर आले आहे.