लक्ष्मी देवीचे घरी आगमन व्हावे म्हणुन वसुबारस या दिवशी सातारा जिल्ह्यात सुवासिनीनी गाय-वासराची हळद कुंकू वाहत पुजा केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने 70 वर्षीय वृध्दाला पकडून त्याच्याकडून गांजा जप्त केला.
पाटखळ माथा ते वाठार रस्त्यावर पाटखळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रज्वल अनिल साबळे (वय 21, रा. वडूथ ता.सातारा) हा युवक ठार झाला.
सातारा शहर परिसरातील मल्हार पेठ व धनगरवाडी येथून दोन दुचाकी चोरी झाल्या आहेत.
जुन्या वादाच्या कारणातून पाचशे एक पाटी, सातारा येथे जैन अस्लम शेख (वय 20, रा.नकाशपुरा पेठ, सातारा) याने साहील फिरोज शेख (वय 29, रा. शनिवार पेठ, सातारा) यांना मारहाण केली.
गोडोली, सातारा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी संशयितांकडून 3220 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
रस्त्याच्या वादावरून वाई शहरात जोरदार मारामारी झाली. या मारहाणीत आठ जण गंभीर जखमी झाले. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाण प्रकणा वरून पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर वातावरण तणावपूर्ण होते.
वर्ये, तालुका सातारा येथील मागासवर्गीय वस्तीतील वहिवाटीचा रस्ता जातीय द्वेषापोटी रोखण्यात आला आहे, अशी तक्रार रिपाई गवळी गटाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा अनुशेष प्रचंड असून फलटण, उत्तर कोरेगाव, सातारा, माण-खटाव या तालुक्यांमध्ये पाऊस नसल्यामुळे पाण्याची भीषण परिस्थिती आहे.
आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळालेच पाहिजे. हे होत असताना जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे मांडली.