गोडोली, सातारा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी संशयितांकडून 3220 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
सातारा : गोडोली, सातारा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी संशयितांकडून 3220 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर आत्माराम भोसले (वय 28, रा. इंदिरानगर, सातारा), संजय पोपट म्हस्के (वय 47, रा. गोडोली), मधुकर काकासो माने (वय 42, रा. लिंबाचीवाडी नांदगाव ता.सातारा), अतुल बबन पार्टे (वय 34, रा. आष्टे ता.सातारा), शाहरुख हजरत काझी (रा. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. दि. 7 नोव्हेबर रोजी पोलिसांनी ही कारवाई केली.


