maharashtra

सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी


सातारा शहर परिसरातील मल्हार पेठ व धनगरवाडी येथून दोन दुचाकी चोरी झाल्या आहेत.

सातारा : सातारा शहर परिसरातील मल्हार पेठ व धनगरवाडी येथून दोन दुचाकी चोरी झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मल्हार पेठ, सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीएफ 2941 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 6 नोव्हेबर रोजी घडली असून याप्रकरणी अदिल हरुण पटेल (वय 42, रा. मल्हार पेठ) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दुसरी चोरी धनगरवाडी येथे झाली आहे. एमएच 11 सीसी 3424 या क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी विकास एकनाथ पवार (वय 54, रा.गोडोली, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.