maharashtra

सातारा जिल्ह्यात वसू बारस उत्साहात साजरी


लक्ष्मी देवीचे घरी आगमन व्हावे म्हणुन वसुबारस या दिवशी सातारा जिल्ह्यात सुवासिनीनी गाय-वासराची हळद कुंकू वाहत पुजा केली.

सातारा : लक्ष्मी देवीचे घरी आगमन व्हावे म्हणुन वसुबारस या दिवशी सातारा जिल्ह्यात सुवासिनीनी गाय-वासराची हळद कुंकू वाहत पुजा केली.
दिवाळीमध्ये वसुबारसेला मोठे महत्त्व आहे. तत: सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते।, मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी।।, या उक्तीप्रमाणे सातारा शहरात वसू बारसे निमित्त पंचपाळी हौद येथे गाई वासरू पुजनास उपलब्ध करण्यात आले होते. त्याचे पूजन करण्यासाठी शहरातील महिलांनी सकाळपासून गर्दी केली होती. दरम्यान दिवाळीच्या साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झालेली होती.
वसुबारसेच्या प्रारंभाने दिवाळीला सुरुवात झालेली आहे. वसुबारसेला दिवाळीमध्ये गाय आणि वासरू पूजन करण्यात येते. शहरामध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणावर असते. सातारा शहरात पंचपाळी हौद येथे गाय-वासरु उपलब्ध करण्यात आले होते. गाय वासरु पूजन करण्यासाठी सातारा शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तसेच सातारा शहरात बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी सातारकरांनी गर्दी केली होती.