Satara

esahas.com

पर्समधून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

येथील राजवाडा बस स्थानकात एस.टी. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पर्समधून ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ३ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

esahas.com

दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

उसाचे शेत का खोदले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून दोघांना दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर रहिमतपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

नागेवाडी येथे जुगार अड्डयावर छापा

नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत  जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

esahas.com

गोडोली येथून मायलेकी बेपत्ता

गोडोली, ता. सातारा येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

दुचाकी चोरटा गजाआड; डीबीच्या पथकाची कारवाई

मोटारसायकल चोरी प्रकरणी अभिजीत राजाराम लोहार वय ३४ रा. आंबवडे बुद्रुक ता. जि. सातारा सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

esahas.com

दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा

गोंदवले खुर्द, ता. माण गावच्या हद्दीत अज्ञात कार चालकाने दिलेल्या दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याने अज्ञात कार चालकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

esahas.com

आदर्कीत साखरेचा ट्रक पलटी

कापशी ता. फलटण येथील शरयू साखर कारखान्याचा ट्रक हा कारखान्यातून साखर भरून सातारकडे जात होता. दरम्यान, आदर्की गावाबाहेरील माळवाडा बसथांबा व कड्यातील पुलाच्या वळणावर ट्रकचालकास वळणावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक जागेवरच पलटी झाला. यामध्ये सुदैवाने जीवित हानी कोणतीही झाली नाही.

esahas.com

अवैध वीज कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई करा : अजय कुमार बन्सल

अवैध वीज कनेक्शन मुळे मोठ्या प्रमाणावर प्राण्यांना शॉक लागून त्यांचा मृत्यु होत असल्याने अशा वीज कनेक्शन धारकांवर कारवाई करावी, असे पत्र आपण सातारा येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली.

esahas.com

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात पालखी मिरवणूक

मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती आणि ऐतिहासिक शाहूनगरी चे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती, या मिरवणुकीचे आयोजन शाहूनगरी फाउंडेशनच्या संस्थापक वृषालीराजे भोसले यांच्या वतीने करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यामध्ये सातारकर मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.

esahas.com

प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणी; सातारा नगरपालिकेच्या सर्वाधिक पंचवीस हरकती

सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्राथमिक कार्यक्रम सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनांवर हरकतींचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी संपलेल्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातून एकूण 59 हरकती नगरपरिषद संकलन कक्षाकडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर दिनांक 19 व 20 रोजी सुनावणी होणार आहे.