येथील राजवाडा बस स्थानकात एस.टी. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पर्समधून ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ३ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
सातारा : येथील राजवाडा बस स्थानकात एस.टी. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील पर्समधून ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ३ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ मे रोजी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास राजवाडा बस स्थानक येथे शोभा सुनील देवरे, वय ३५, रा. सायळी, ता. सातारा ही महिला सातारा ते पाटेकर अलवडी या एस.टी. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यात असलेल्या पर्समधून ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ३ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.


