Satara

esahas.com

कार-दुचाकी धडकेत युवक ठार

सातारा-म्हसवड रस्त्यावर गोंदवले खुर्दनजीक स्वीफ्ट कार आणि पल्सर दुचाकीच्या भीषण अपघातात पानवण, ता. माण येथील युवक ठार झाला. उमाजी आप्पा नरळे असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीवरील अजित नरळे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.  

esahas.com

वाई पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

मॅप्रो फूड स कंपनीत ४१ लाख रुपये किंमतीच्या डाय व यांत्रिक मोटारी चोरणाऱ्या वाई शहरातील दोघांना वाई पोलिसांनी शहर परिसरातून अटक केली. गौरव गुळुंबकर व जय घाडगे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

esahas.com

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकास सहा महिने सक्तमजुरी

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने विकास दत्तात्रय जाधव वय 28 राहणार निसराळे तालुका जिल्हा सातारा याला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तिसरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी हे आदेश दिले.

esahas.com

जिहे-कठापूर योजनेसाठी मी 134 कोटी मंजुर केले : आ. शशिकांत शिंदे

दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्‍या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना 134 कोटी मंजुर केले. नेर तलाव्यात पाणी आले.

esahas.com

जिल्हा बँकेत पगार होणार्‍या खातेदारांच्या वारसाला 30 लाख रुपये अपघात विमा रक्कम अदा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेळोवेळी ग्राहकाभिमुख योजना राबवत असते. या योजनाना ग्राहक खातेदारांचा कायमच चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला विमा संरक्षण असणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने घरातील कमावती आणि जबाबदार व्यक्ती विमा संरक्षित असणे महत्वाचे आहे.

esahas.com

किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील

किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची निवड करण्यात आली. कारखान्याच्या निवडणुकीत 19 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व 21 जागा जिंकत सत्ता काबीज केली होती.

esahas.com

बडीशेप आणि साखर खाण्याचे अनके फायदे; हिमोग्लोबिन वाढेल, दृष्टीही सुधारेल

माउथ फ्रेशनर म्हणून दिली जाणारी बडीशेप आणि साखर खाल्ल्याने दृष्टी सुधारते. त्यामुळे पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात तसेच शरीरातील हिमोग्लोबिनही वाढते.

esahas.com

सातारा येथून मोबाइलची चोरी

येथील शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

सासपडे येथे महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

सासपडे, ता. सातारा येथे एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

साताऱ्यातील युवकाला सासरा आणि मेहुण्याकडून अहमदनगरमध्ये चोप

पत्नीला आणण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे साताऱ्या वरून गेलेल्या युवकाला सासरा आणि मेव्हण्याने बेदम मारहाण केली.