सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने विकास दत्तात्रय जाधव वय 28 राहणार निसराळे तालुका जिल्हा सातारा याला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तिसरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी हे आदेश दिले.
सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने विकास दत्तात्रय जाधव वय 28 राहणार निसराळे तालुका जिल्हा सातारा याला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तिसरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी हे आदेश दिले.
या खटल्याची माहिती अशी, दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता देशमुख नगर येथे वाहन तपासणी च्या दरम्यान विकास जाधव आपल्या वाहनावरून ट्रीपल सीट जात होता. त्यावेळी बोरगाव पोलिसांनी त्याला इशारा करूनही त्याने वाहन न थांबवता पुढे दामटले. पोलिसांनी त्याकडे चौकशी केली असता तू कोण आम्हाला विचारणारा, असे म्हणून आरोपीने फिर्यादीशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही एस डाळिंबकर यांनी केला. त्या अनुषंगाने त्यांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. तिसरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर के राजे भोसले यांच्या कोर्टात हा खटला चालला. वकिल महेश शिंदे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. या केसमध्ये सहा साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीस 353 नुसार सहा महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
पैरवी अधिकारी श्रीमती सुनिता देखणे यांनी या खटल्यात कामकाज पाहिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, प्रोसेक्युशन स्क्वाडचे उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घोरपडे व अमित भरते यांनी या खटल्यामध्ये मदत केली.


