maharashtra

कार-दुचाकी धडकेत युवक ठार


Young man killed in car-bike collision
सातारा-म्हसवड रस्त्यावर गोंदवले खुर्दनजीक स्वीफ्ट कार आणि पल्सर दुचाकीच्या भीषण अपघातात पानवण, ता. माण येथील युवक ठार झाला. उमाजी आप्पा नरळे असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीवरील अजित नरळे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.  

सातारा : सातारा-म्हसवड रस्त्यावर गोंदवले खुर्दनजीक स्वीफ्ट कार आणि पल्सर दुचाकीच्या भीषण अपघातात पानवण, ता. माण येथील युवक ठार झाला. उमाजी आप्पा नरळे असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीवरील अजित नरळे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.  
दुपारी बाराच्या सुमारास स्वीफ्ट कार सातारा दिशेने निघाली असताना उमाजी आप्पा नरळे व अजित नरळे हे पल्सरवरून पानवणच्या दिशेने निघाले होते. दोन्ही गाड्यांचा भीषण अपघात झाल्यानंतर कार रस्त्याकडेच्या शेतात जाऊन पलटी झाली, तर दुचाकीही लांब फेकली गेली. त्यानंतर तिला आग लागली.