येथील शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ मे रोजी ८ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील शाहू स्टेडियम ते गुरुवार पेठ पार्किंगमध्ये येत असताना अथर्व दीपक शिंदे, वय २२, रा. गुरुवार पेठ, सातारा यांच्या मालकीचा १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.


