दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना 134 कोटी मंजुर केले. नेर तलाव्यात पाणी आले.
पुसेगाव : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना 134 कोटी मंजुर केले. नेर तलाव्यात पाणी आले. त्या पाण्याचे पुजन भल्या पहाटेच करून मीच पाणी आणले असल्याचा कांगावा करून श्रेयवाद घेण्याचा केविलवाण प्रयत्न केला. मी या श्रेयवादात पडणार नसून येणार्या काळात उत्तर खटावच्या भागात जिहे - कठापूरचे पाणी शेतकर्यांना पोहचवून दुष्काळी भागाचे नंदनवन करणार असल्याचे प्रतिपादन माजी जलसंपदामंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
राजापूर ता. खटाव येथे 50 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ तसेच नाईक समाज सभामंडप उद्घाटन व नव निर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व विकास सेवा सोसायटीचे संचालक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदिप विधाते,. कॉगेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद सदस्या सौ सुनिता कचरे, बुधचे माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, मानाजी घाडगे, माकॅट कमिटीचे संचालक राजेंद्र कचरे, डिस्कळचे सरपंच डॉ महेश पवार, राष्ट्रवादीे युवकचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर जगताप, माजी सरपंच राजेंद्र घाटगे, महेश नलवडे, पोपटराव बिटले, लहुकुमार घाडगे, युवानेते अमित जगताप, चेअरमन राहुल फडतरे, अरुण वाघ, जगन्नाथ घाटगे, मनोज नलवडे, सरपंच वनिता पवार, उपसरपंच रविंद्र घनवट, नारायण घनवट उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, राजापूर येथे जलसंधारणाची कामे भरपूर झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही. राजकारणात मोठेपणा असावा लागतो. मांजरवाडी, राजापूर भागाला पाणी येऊन हरितक्रांती झालीच पाहिजे. या परिसराला पाणी मिळालेच पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करत आहे. राजकारणात या भागातील जनता माझ्यावर भरभरून प्रेम करून आशिर्वाद देतात. हे माझे भाग्य आहे. याचा मला अभिमान असून चांगली माणसे हीच माझी पुंजी आहे.. येणार्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला साथ द्या ’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता कचरे म्हणाल्या, आ. शशिकांत शिंदे यांच्या आशिर्वादाने पुसेगाव गटाने मला जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समितीत प्रतिनिधीत्व करण्याची संघी दिली. जनतेच्या प्रेमामुळे पुसेगाव गटातील समस्या व विकासाबाबत आवाज उठवून नेहमीच लोकहिताची कामे मार्गी लावली. भविष्यात मतदार संघाचा चेहरामोहरा बदलू असा विश्वास व्यक्त केला. तसेच. पुसेगाव गट नेहमीच आ. शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहिला असून माझ्यावरही गटातील जनतेने विश्वास दाखविला आहे. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या साथीमुळे मी महिला असूनही समाजकार्य करीत आहे. गावच्या विकासासाठी लोकांनी एकोप्याने नेहमीच आ. शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. पुसेगाव गटात सर्वात जास्त निधी राजापूर गावासाठी दिला आहे.
याप्रसंगी प्रदीप विधाते, मानाजी घाडगे यांची भाषणे झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन घनवट यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच राजेंद्र घाटगे बापू यांनी केले तर आभार प्रशांत घनवट यांनी मानले. यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य जयवंतराव डंगारे, अरविंद घाटगे, संतोष जगदाळे, गणेश मेळावणे, अमोल घाडगे, संपत मदने, नागेश घनवट, रामभाऊ डंगारे, बापूराव बागल, सुनिल फडतरे, महिपतराव डंगारे, लक्ष्मण घनवट, शिवाजी घनवट, निलेश घनवट, व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजेंद्र धाटगे बापू यांनी राजापूरमध्ये आपल्या कुशल नेतृत्वाखाली संघटनेची ताकद मजबूत करत 40वर्षे सत्ता संघटनेच्या ताब्यात ठेवत्या आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी ठेवून राजकारण करताना राजकारणाचा दर्जा ठेवला पाहिजे. तरच गावाचा विकास व्हायला वेळ लागत नाही, असे गौरवोद्गार आ. शशिकांत शिंदे यांनी राजेंद्र घाटगे योना एकपष्टीच्या शुभेच्छा देताना काढले.