वाई पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
३५ लाख रुपयांच्या ॲल्युमिनियमच्या विटा हस्तगत
मॅप्रो फूड स कंपनीत ४१ लाख रुपये किंमतीच्या डाय व यांत्रिक मोटारी चोरणाऱ्या वाई शहरातील दोघांना वाई पोलिसांनी शहर परिसरातून अटक केली. गौरव गुळुंबकर व जय घाडगे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सातारा : मॅप्रो फूड स कंपनीत ४१ लाख रुपये किंमतीच्या डाय व यांत्रिक मोटारी चोरणाऱ्या वाई शहरातील दोघांना वाई पोलिसांनी शहर परिसरातून अटक केली. गौरव गुळुंबकर व जय घाडगे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
शेंदूरजणे (ता वाई) येथील मॅप्रो फूड्स या कंपनीच्या आवारातून ४१ लाख ८० हजार रुपये किमतीच्या जेली प्रोडक्ट तयार करण्याच्या ॲल्युमिनियम आणि कास्टिंग पासून तयार झालेल्या ९८७५ डाय आणि ३५ लहान-मोठ्या मोटारी चोरीस गेल्याची तक्रार धनराज त्र्यंबक बुंदगे यांनी वाई पोलिस पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. ही चोरी वाई शहरातील दोन इसमांनी केली असल्याची बातमी पोलिसांना खास बातमीदारा मार्फत मिळाली.
या आरोपींचा पुणे, शिरवळ, वाई येथे शोध घेण्यात आला. वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गौरव गुळंबकर आणि जय घाडगे या दोन इसमांना वाई येथून ताब्यात घेत त्यांना अटक केली.
या आरोपींनी चोरी केली असल्याची कबुली देत त्यांनी विकलेला माल वितळून ॲल्युमिनियमच्या विटा तयार केले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून १२६० किलो वजनाच्या ३४ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या ॲल्युमिनियमच्या विटा हस्तगत केल्या आहेत.