maharashtra

दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


Both were charged with aggravated assault
उसाचे शेत का खोदले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून दोघांना दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर रहिमतपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : उसाचे शेत का खोदले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून दोघांना दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर रहिमतपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ मी रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास कठापुर, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत एका शिवारामध्ये असलेल्या उसाच्या शेतामधुन पाण्याची पाइपलाइन नेण्याकरता हिम्मत आनंदराव कणसे, देवदास आनंदराव कणसे दोघेही रा. कठापुर यांनी तेथीलच विनोद विलास केंजळे यांचे उसाचे शेत खोदले होते. विनोद केंजळे यांनी याबाबत जाब विचारला असता हिंमत कणसे, देवदास कणसे यांनी त्यांना व त्यांचा भाऊ गणेश केंजळे यांना खोऱ्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याची तक्रार रहीमतपुर पोलीस ठाण्यात दाखल झाले.