गोडोली, ता. सातारा येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : गोडोली, ता. सातारा येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१४ मे रोजी सकाळी आठ ते पाच वाजण्याच्या सुमारास गोडोली येथील राहत्या घरातून सौ. रीना शेखर किर्ते वय ४० या मुलगी महिमा शेखर किर्ते वय ७ वर्षं मूळ राहणार आरे - दरे, ता. सातारा या कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेल्या त्या अद्याप परत न आल्याची तक्रार शेखर शंकर किर्ते यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


