अवैध वीज कनेक्शन मुळे मोठ्या प्रमाणावर प्राण्यांना शॉक लागून त्यांचा मृत्यु होत असल्याने अशा वीज कनेक्शन धारकांवर कारवाई करावी, असे पत्र आपण सातारा येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली.
सातारा : अवैध वीज कनेक्शन मुळे मोठ्या प्रमाणावर प्राण्यांना शॉक लागून त्यांचा मृत्यु होत असल्याने अशा वीज कनेक्शन धारकांवर कारवाई करावी, असे पत्र आपण सातारा येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली.
बुधवारी जिल्हा व्याघ्र कक्ष समितीची बैठक अजय बन्सल यांच्या दालनात झाली. त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष बागडी, वनपाल दीपक गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे उपस्थित होते.
बैठकीमध्ये वन्य प्राण्यांची शिकार, तस्करी व संपत्तीचे नुकसान, वणवा लावणे अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या इसमांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले यावेळी ग्रामीण भागात काही संप पिकांचे नुकसान होऊ नये याचा पिकांना तार कंपाउंड करून त्यावर विजेच्या तारांचा आकडा टाकून तार कंपाउंड विजेचा शॉक देत असल्याने प्राण्यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर अजय कुमार बन्सल यांनी याबाबत आपण वीज वितरण कंपनीची पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले.


