maharashtra

दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा


An unidentified car driver was found guilty of causing the deaths of the two
गोंदवले खुर्द, ता. माण गावच्या हद्दीत अज्ञात कार चालकाने दिलेल्या दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याने अज्ञात कार चालकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

सातारा : गोंदवले खुर्द, ता. माण गावच्या हद्दीत अज्ञात कार चालकाने दिलेल्या दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याने अज्ञात कार चालकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ मे रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गोंदवले खुर्द गावच्या हद्दीत दहिवडी ते मसवड मार्गावर मेजर फॅमिली गार्डन हॉटेल समोर उमाजी अण्णा नरळे वय २० आणि अजित शंकर नरळे वय २० दोघेही रा. पानवन, ता. माण हे पुणे येथून दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना अज्ञात स्विफ्ट कार क्रमांक एम. एच. १४ जीएच ४४५८ वरील अज्ञात चालकाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार आप्पा दिगंबर नरळे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.