नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा : नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेवाडी गावच्या हद्दीत पारेख पेट्रोल पंपा शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला शरद आनंद जगदाळे, वय ३५, रा. कोंडवे, ता. सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी ४६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


