Satara

esahas.com

मुंबईच्या सोने व्यापार्‍याला म्हसवड परिसरात लुटले

मुंबईचे व्यापारी सोने खरेदी करुन अकलुज येथील त्यांच्या पेढीत निघाले असता म्हसवड नजिक दोन दुचाकींवरुन आलेल्या लुटारुंनी त्यांना पिस्तुलाच्या धाकाने लुटले. या लुटमारीत सुमारे 20 लाखांचे सोने लुटून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

esahas.com

चोरीतील व हरवलेले 13 लाखांचे 82 मोबाईल परत करण्यात यश

मोबाईल चोरीच्या व हरवल्याच्या तक्रारींचे निवारण करताना सातारा सायबर पोलीस ठाण्यातील नेमण्यात आलेल्या खास पथकाने 13 लाख रुपये किंमतीचे 82 मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून ते नागरिकांना परत करण्यात यश मिळवले असून नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

esahas.com

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांवर गुन्हे

येथील पारंगे चौक ते पोवई नाका मार्गावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

फरांदवाडी येथून ५० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरीस

फरांदवाडी, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

वाठार स्टेशन येथे जुगार अड्डयावर छापा

वाठार स्टेशन, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकला.

esahas.com

बनवडी येथे दारू अड्डयावर छापा

बनवडी, ता. कोरेगाव येथे दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ८३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

esahas.com

अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

अज्ञात दुचाकी चालकाने दुचाकीला धडक देऊन त्यावरील चालकाला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

esahas.com

शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एकावर गुन्हा

पत्नीला माझ्याकडे नांदवायला पाठवा, असे म्हणत घरात घुसून एकाने पत्नी, सासु, मेहुणी यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

esahas.com

गोडोली तळ्यावर बसणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा

गोडोली तळे परिसरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचा पुतळा बसवण्याच्या शाहूनगरी फाउंडेशनच्या मागणीला सातारा पालिकेने हिरवा कंदील दिला आहे. हा विषय धोरणात्मक असल्याने जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सुद्धा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती शाहूनगरी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष वृषाली राजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

esahas.com

विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा

सातारा जिल्ह्यातील विकासाच्या मुद्द्यावर जिल्ह्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिवसेना सर्वत्र वाढविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ठाम ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मी शिवसेनेतच असून माझी कोणावरही नाराजी नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.