येथील पारंगे चौक ते पोवई नाका मार्गावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील पारंगे चौक ते पोवई नाका मार्गावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलिसांना एसटी स्टँड ते पारंगे चौक परिसरामध्ये एक 22 वर्षीय तरुण पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला. त्याला शिताफीने ताब्यात घेत त्याची झडती घेतली. व एक लाख 50 हजार रूपयांची पिस्तुल जप्त करत त्याला अटक केली आहे. सुरज मुन्ना शेख (वय 22, रा. देगाव रोड, भुईंज, ता. वाई) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार दि. 27 रोजी पोलीस नाईक निलेश यादव यांना सुरज शेख हा एसटी स्टँड ते पारंगे चौक परिसरामध्ये पिस्तुल घेवून येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या माहिती च्या आधारे पोलीस हेड कॉन्टेबल श्रीनिवास देशमुख, पोलीस नाईक निलेश यादव, पोलीस नाईक राहूल घाडगे यांनी टीम तयार करून परिसरात सापळा लावला. यावेळी सुरज शेख हा 2.30 वाजण्याच्या सुमारास परिसरात संशयितरित्या जात असल्याचे दिसून आले. त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करता त्याला ताब्यात घेत त्याची झडाझडती घेतली. यावेळी 1 लाख रूपये किंमतीचे गावठी पिस्टल, 50 हजाराचे गावठी रिव्हॉल्व्हर, व 120 रूपये रोख रक्कम मिळून आली. पोलीस नाईक निलेश सर्जेराव जाधव यांनी त्याला दोन पिस्तुल कोणाला विकण्यासाठी आला होता, असे विचारले. यावेळी त्याने मी सातारा येथे गिऱ्हाईक शोधण्यासाठी आलो असल्याचे सांगत आपणाला हि पिस्तुले क्षितिज वीरसेन जाधवराव, रा. भुईंज, ता. वाई याने दिली असल्याचे सांगितले. या दोघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज मुन्ना शेख याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने हे करीत आहेत, अशी माहिती शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली आहे.


