बनवडी, ता. कोरेगाव येथे दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ८३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
सातारा : बनवडी, ता. कोरेगाव येथे दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ८३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,बनवडी येथील महादेव रामचंद्र जाधव हा घराच्या पाठीमागे आडोशाला देशी दारूच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ४ हजार ८३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.