फरांदवाडी, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : फरांदवाडी, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ ते दि.२७ जुलै रोजी फरांदवाडी गावच्या हद्दीतील तांबमळा वस्तीवर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधुन अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची तक्रार विजय शिवाजी मदने रा. साखरवाडी यांनी फलटण शहर पोलिसांना दिली आहे.


