maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा


अज्ञात दुचाकी चालकाने दुचाकीला धडक देऊन त्यावरील चालकाला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सातारा : अज्ञात दुचाकी चालकाने दुचाकीला धडक देऊन त्यावरील चालकाला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० जुन रोजी १० वाजण्याच्या सुमारास वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर दुचाकी क्रमांक एम.एच.१२ इएन ५१६३‌ वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, दुचाकी अविचाराने चालवुन ऋषिकेश राजेंद्र नलावडे, रा. वर्ये,‌ता. सातारा याला जखमी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.