maharashtra

शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एकावर गुन्हा


पत्नीला माझ्याकडे नांदवायला पाठवा, असे म्हणत घरात घुसून एकाने पत्नी, सासु, मेहुणी यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

सातारा : पत्नीला माझ्याकडे नांदवायला पाठवा, असे म्हणत घरात घुसून एकाने पत्नी, सासु, मेहुणी यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२७ जुलै रोजी ३.३० वाजण्याच्या सुमारास विलासपुर, ता. सातारा येथील इंदिरानगर परिसरात असणाऱ्या आकाश हिंदुराव आवटे यांच्या घरात वैभव उमेश सोनवणे, वय ३५, चंदननगर, एमआयडीसी, सातारा हा दारू पिऊन अनाधिकाराने घुसला. त्याने फिर्यादी आकाश आवटे यांना माझी पत्नी पुनम हिला माझ्याकडे नोंदवायला पाठवा, असे म्हणून त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी सोनवणे यांची सासु, पत्नी, आणि बहीण हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता त्यांना चाकुचा धाक दाखवुन शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.