चोरीतील व हरवलेले 13 लाखांचे 82 मोबाईल परत करण्यात यश
सातारा सायबर पोलिसांची कामगिरी : सातारकरांनी केले पोलिसांचे अभिनंदन
मोबाईल चोरीच्या व हरवल्याच्या तक्रारींचे निवारण करताना सातारा सायबर पोलीस ठाण्यातील नेमण्यात आलेल्या खास पथकाने 13 लाख रुपये किंमतीचे 82 मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून ते नागरिकांना परत करण्यात यश मिळवले असून नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
सातारा : मोबाईल हरवणे वा चोरी होण्याच्या घटना वाढल्या असून यामुळे पोलिसांचे काम देखील वाढले आहे. मोबाईल चोरीच्या व हरवल्याच्या तक्रारींचे निवारण करताना सातारा सायबर पोलीस ठाण्यातील नेमण्यात आलेल्या खास पथकाने 13 लाख रुपये किंमतीचे 82 मोबाईल तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून ते नागरिकांना परत करण्यात यश मिळवले असून नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
त्या नागरीकांना मोबाईल हे त्यांचेकडील कागदपत्रांची ओळख पटवुन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक सुनिल शेळके. सायबर पोलीस ठाणे सातारा व सायबर पोलीस ठाणेचे तपास पथकातील सर्व अंमलदार यांचे उपस्थितीत मोबाईल देण्यात आले नागरीकांना त्याच्या हरवलेला मोबाईल मिळेल असे अपेक्षित नसताना पुन्हा मोबाईल मिळाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले व तसेच मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहन्यावर दिसुन आला.
याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हयातील नागरिकांचे मोबाईल हे गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याबाबतचा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकडून माहिती घेवून त्यांना सायबर पोलीस ठाणे मार्फत गहाळ झालेल्या मोबाईलची तसेच चोरीच्या गुन्हयात गेलेले मोबाईलची तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहिम राबवून मोबाईल नागरिकांना परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांनी सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे इ. अंमलदार यांचे पथक जिल्हयातून गहाळ झालेले मोबाईल शोधकामी नेमले होते. या पथकांनी मागील एक महिन्यामध्ये तांत्रिक माहितीचे अत्यंत तंत्रशुध्द पध्दतीने विश्लेषण करुन अंदाजे 13 लाख रुपये किंमतीचे 82 मोबाईल शोधुन ते ताब्यात घेण्यात सायबर पोलीस पथकास यश आले आहे.
या कामगिरीत सायबर पोलीस ठाणे सातारा कडील पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, पोलीस अंमलदार अजय जाधव, अमित झेंडे, महेश शेटे, सावंत, सचिन पवार, संदिप पाटील, वर्षा खोचे, रेश्मा चव्हाण, यशोमती काकडे, ज्योती शिंदे, प्रविण आहिरे, सुशांत कदम, महेश पवार, यशवंतराव घाडगे यांनी सहभाग घेतला आहे.


