माण तालुक्यातील पिंगळी बु|| येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात प्रमोद सूरेश माने, वय ३३, रा. वरकुटे-म्हसवड, ता.माण यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर माळशिरस येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
बालविवाह करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या पतीवर तर संबंधित पीडित मुलगी ही अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावून दिल्याप्रकरणी तिचे आई-वडील आणि सासु-सासरे अशा पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत स्विफ्ट कारमधील अज्ञात चालकाने दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वाराला जखमी केल्याप्रकरणी अज्ञात कारचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कराड तालुक्यातील कार्वे गावात स्कॉर्पिओ चालकाने दोन मोटरसायकलींना जोरदार धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
सातारा शहर परिसरात असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील कड्यावरून पडलेल्या व्यक्तीला जीवदान देण्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम आणि पोलिसांना यश मिळाले. हणमंत जाधव असे त्यांचे नाव असून ते १४ पेक्षा अधिक तास दरीत अडकून पडले होते.
सातारा शहरालगत असणार्या दत्तनगर कोडोली येथे अष्टविनायक कॉलनीमध्ये घरगुती वादातून सख्ख्या चुलत्याने केवळ दहा महिन्यांच्या भावाच्या मुलाला विहिरीत टाकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. शाल्मोन मयूर सोनवणे असे या दुर्दैवी बाळाचे नाव आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांनी उच्चपदावर गवसणी घातल्याचे आपण पाहतो. विलासपूर शाळेचा पट चांगला आहे. या शाळेला भौतिक सुविधा देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, अशी ग्वाही युवा नेते संग्राम बर्गे यांनी दिली.
आमदार जयकुमार गोरे शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्यापुढे शरण आले. त्यानंतर त्यांच्या जामिनावर सुनावणी सुरु झाली. न्यायालयाने 11 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन दिल्याने तुर्तास त्यांची अटक टळली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सुनेला बाहेर का जातेस, म्हणून घरात डिझेलने पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भिलार येथे सासू, सासरा व नवऱ्याविरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गेंडामाळ झोपडपट्टी, सातारा येथील वैभव उर्फ बबन लोंढे याचा पुणे जिल्ह्यातील भोर, ता. वेळू गावानजीक दुचाकीचा अपघात झाला असुन त्यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याची पत्नीही जखमी झाली आहे. वैभववर वेळू गावातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.