maharashtra

पिंगळीत दुचाकीच्या भीषण अपघातात अभियंता ठार; दोघे गंभीर


Engineer killed in horrific bike accident in Pingli; Both serious
माण तालुक्यातील पिंगळी बु|| येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात प्रमोद सूरेश माने, वय ३३, रा. वरकुटे-म्हसवड, ता.माण यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर माळशिरस येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

म्हसवड : माण तालुक्यातील पिंगळी बु|| येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात प्रमोद सूरेश माने, वय ३३, रा. वरकुटे-म्हसवड, ता.माण यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर माळशिरस येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सातारा लातूर महामार्गावरील पिंगळी येथील सत्रेवाडी येथे रविवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकजण जागेवरच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकीला (क्र. एमएच ११टीबी६४०८) समोरून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमएच ४५ पी १५६१) जबर धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद सुरेश माने वय ३३ वर्षे, रा. वरकुटे-म्हसवड ता. माण यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर माळशिरस येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
वरकुटे-म्हसवड येथील प्रमोद माने हे वडूज येथील एमएससीबी मध्ये अभियंता पदावर कार्यरत होते. वेळापूर, ता.माळशिरस येथे नातेवाईकांचा अंत्यविधी कार्यक्रम करून वडुजला ते दुचाकीवरून जात असताना वडुज वरुन माळशिरस कडे जाणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की प्रमोद माने यांचा जागीच मृत्यू झाला. प्रमोद माने महावितरण कॉग्रेस इंटक कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावरही कार्यरत होते.