गेंडामाळ झोपडपट्टी, सातारा येथील वैभव उर्फ बबन लोंढे याचा पुणे जिल्ह्यातील भोर, ता. वेळू गावानजीक दुचाकीचा अपघात झाला असुन त्यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याची पत्नीही जखमी झाली आहे. वैभववर वेळू गावातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सातारा : गेंडामाळ झोपडपट्टी, सातारा येथील वैभव उर्फ बबन लोंढे याचा पुणे जिल्ह्यातील भोर, ता. वेळू गावानजीक दुचाकीचा अपघात झाला असुन त्यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याची पत्नीही जखमी झाली आहे. वैभववर वेळू गावातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
काल दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास वैभव भोर तालुक्यातील वेळू येथून जात असताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याची पत्नीही जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी त्या दोघांना वेळू येथीलच एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात टेंडरवर सफाई कामगार म्हणून तो काम करत होता मात्र गेल्या आठवड्यात सातारा नगरपालिकेने टेंडरवरचे कर्मचारी कमी केल्याने पुणे येथे नोकरीच्या शोधात जात असताना हा अपघात झाल्याने वैभव याचा रोजगार तर गेलाच त्यात नियतीचा फटकाही त्याला बसला आहे.


