विलासपूर शाळेला भौतिक सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
युवा नेते संग्राम बर्गे यांनी दिली ग्वाही; मुलांना शालेय साहित्याचे वाटप, शिक्षकांनी मांडल्या व्यथा
इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांनी उच्चपदावर गवसणी घातल्याचे आपण पाहतो. विलासपूर शाळेचा पट चांगला आहे. या शाळेला भौतिक सुविधा देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, अशी ग्वाही युवा नेते संग्राम बर्गे यांनी दिली.
सातारा : इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांनी उच्चपदावर गवसणी घातल्याचे आपण पाहतो. विलासपूर शाळेचा पट चांगला आहे. या शाळेला भौतिक सुविधा देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, अशी ग्वाही युवा नेते संग्राम बर्गे यांनी दिली.
युवा नेते संग्राम बर्गे मित्र परिवाराच्या वतीने विलासपूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय सुर्यवंशी, संजय चव्हाण, राहुल पाटोळे, मुकुंद पवार, दीपक पवार, सचिन पवार, विक्रम पवार, कृष्णात नलवडे, सूरज देवडे, लक्ष्मण आलकुंटे, निलेश पाटील, महेश चौगुले, अमोल खोपडे, सचिन भोसले, दीपक सुतार, हिंमत पाटील, दीपक डोंगरे, रणजित भस्मे, गणेश नलवडे, शांताबाई कदम, सुजाता पाटील, लता सुर्यवंशी, सुवर्णा पाटील, सुजाता पाटोळे, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवा नेते संग्राम बर्गे म्हणाले, विलासपूरची शाळा पाहिली. या शाळेतील शिक्षक चांगले आहेत. विद्यार्थी संख्या ही चांगली आहे. शाळेचा इमारतीचा जागेचा प्रश्न आमचे नेते खासदार श्री. छ. उदनराजे महाराज साहेब यांच्या माध्यमातून निकाली काढून प्रश्न मार्गी लावण्याशिवाय गप्प बसणार नाही. आज आपण पाहतो मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठ्या पदावर आहेत. मोठे व्यवसायिक आहेत. त्याकरिता या शाळेला भौतिक सुविधा देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी या शाळेच्या शिक्षिकानी शाळेच्या समस्याचा पाढा वाचून दाखवला. या शाळेत स्वराज्यनगर, पालवी चौक येथून मूल येतात. 168 शाळेचा पट आहे. शाळेच्या इमारतीची अडचण आहे. 10 बाय 10 च्या इमारतीत 35 -35 मुलं बसतात.बसायला मुलांना जागा नाही. मांडी घालून मुलं कंटाळून जातात. भौतिक सुविधा नाही. शिक्षण मुलांचा हक्क आहे. तसेच शिक्षणासाठी गरजेच्या असणाऱ्या भौतिक सुविधा या मुलांना मिळाल्या पाहिजेत. इमारत होणे गरजेचे आहे. इमारतीसाठी सगळ्यांनी जोर लावावा, अशी विनंती करण्यात आली.
आणि मूले झाली आनंदी
शाळेतील मुलांना नवं दप्तर मिळाल्याने सर्वच शाळेच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. काही मुलांनी तर आवर्जून नवं दप्तर आज शाळेत आम्हाला मिळालं असं आपल्या पालकांना सांगितले. त्यामुळे पालकांनी ही संग्राम बर्गे मित्र परिवाराचे आभार मानले.


