maharashtra

मद्यधुंद स्कार्पिओ चालकाने दुचाकीस्वाराला नेले फरफटत; भीषण अपघाताचा थरार


कराड तालुक्यातील कार्वे गावात स्कॉर्पिओ चालकाने दोन मोटरसायकलींना जोरदार धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

सातारा : कराड तालुक्यातील कार्वे गावात स्कॉर्पिओ चालकाने दोन मोटरसायकलींना जोरदार धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ चालकाने दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. त्यातील एका तरुणाला स्कॉर्पिओ चालकाने एका मोटरसायकलला तीस फूट फरफटत नेले.या भीषण अपघातात मोटारसायकलवरील एक तरूण उडून मागे पडला, तर दुसरा मोटरसायकलसह स्कार्पिओच्या बंपरखाली अडकल्याने फरफटत गेला.
या अपघातात संतोष थोरात आणि शिवाजी देसाई हे दोन तरूण गंभीररित्या जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील स्कॉर्पिओ चालक कार्वे गावातीलच असून घटनेवेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातातील स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्हीत फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दृष्यानुसार स्कॉर्पिओ ही अतिशय वेगात असल्याचे दिसत आहे. स्कॉर्पिओ चालकाने उजवीकडे वळण घेताना समोर येणार्‍या दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली आणि त्यांना फरफटत नेले.