बालविवाह करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या पतीवर तर संबंधित पीडित मुलगी ही अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावून दिल्याप्रकरणी तिचे आई-वडील आणि सासु-सासरे अशा पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : बालविवाह करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या पतीवर तर संबंधित पीडित मुलगी ही अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावून दिल्याप्रकरणी तिचे आई-वडील आणि सासु-सासरे अशा पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव, ता. कोरेगाव परिसरात वास्तव्य करणार्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह किसन पप्पू पवार, रा. जयमल्हार कोयना सोसायटी, कातकरी वस्ती, खेड, ता. सातारा याच्याशी करून दिला. किसन पवार याने दि. 24 डिसेंबर 2021 ते दि. 1 ऑगस्ट 2022 या कालावधीत तिच्यासमवेत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने त्यात ती गरोदर राहिली. पिडीत ही अल्पवयीन असतानाही तिचे आई-वडील व सासरे पप्पु गुलाब पवार, सासु गीता पप्पु पवार अशा पाच जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना अशोक शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


