Satara

esahas.com

पत्नीनेच दिली पतीला मारायची सुपारी

कनिष्ठ अभियंत्याला अज्ञातांनी एक वर्षांपूर्वी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी 3 संशयितांना औंध पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे तब्बल एक वर्षानंतर अटक केली आहे. दिलीप महादेव माळी असे कनिष्ठ अभियंत्यांचे नाव असून यामध्ये त्यांच्या पत्नीचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशयितांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

esahas.com

चिमुरडीवर अत्याचार करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दहा दिवसांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली होती. यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात बोरगाव पोलिसांना अखेर यश प्राप्त झाले.

esahas.com

20 ऑगस्ट रोजी होणार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांत होणार आहे.

esahas.com

सातारा जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

गेली दोन वर्षे करोना आजाराच्या त्रासामुळे राज्यातीलच नव्हे तर सर्व देशातील सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोठी अडचण होती. मात्र यावर्षी सर्वच निर्बंध शिथिल झाल्यानंतर यावर्षीची जन्माष्टमी गुरुवारी मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली.

esahas.com

भारतीय जवानाच्या लग्नात रक्तदान शिबिर घेऊन हर्ष फाउंडेशनने वेगळ्या पद्धतीने केला स्वातंत्र्य दिन साजरा

15 ऑगस्ट या अमृत महोत्सवी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जवान नवनाथ पवार यांनी आपली अर्धांगिनी सुमन यांच्याशी विवाह कार्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

esahas.com

यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बीला परवानगी नाही

यंदाच्या गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सातारा शहरात डॉल्बी वाढवण्यासाठी अजिबात परवानगी दिली जाणार नाही याची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्पष्टपणे नोंद घ्यावी, अशी माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

esahas.com

दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील : जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी

दिव्यांग हा समाजातील वंचित घटक असून सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच प्रशासकीय बैठक आयोजित करून दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही सातारचे नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिव्यांग बांधवांशी बोलताना दिली.

esahas.com

कास परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई होणार का ? नेहमीप्रमाणे नोटीसच का?

गत जिल्हाधिकारी श्री. दलाल यांना कारवाई करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. परंतु, आज अखेर नोटीसा व्यतरिक्त कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून करण्याचे धाडस झाले नाही. कास परिसरातील ३१ मालमत्तांचा विषय न्याय प्रविष्ट असून इतर १२४ मालमत्तांवर सातारा तहसिलदार यांनी नेहमीप्रमाणे ५२-५३ अंतर्गत सात दिवसात बांधकाम काढले नाही तर सातारा जिल्हा प्रशासन स्वतःहून अतिक्रमण काढणार व झालेला सर्व खर्च बोजा म्हणून मिळकतीवर चढवणार आशाप्रकारचा नोटिस सातारा तहसिलदार आशा होळकर यांनी दिला आहे. 

esahas.com

महिलेवर लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून कराड तालुक्यातील एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात केल्या प्रकरणी अजित भगवान कांबळे वय ३०, रा. किरपे, ता. कराड याच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

शिवाजीनगर येथे सुमारे ३ लाखांच्या दागिन्यांची चोरी

येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या एका उघड्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.