खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने येथील तालीम संघ मैदानावर आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेसाठी भरघोस रोख रकमांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती मित्र समूहाच्या वतीने सुनिल काटकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.
सातारा शहर परिसरात एका युवतीचा रोहित कुंभार व त्याच्या दोन साथीदारांनी विनयभंग केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात विविध दोन ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून तिघांवर गुन्हा दाखल केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यार दुचाकीवरुन चोरुन हजारो रुपये किंमतीच्या 221 विदेशी दारुच्या बाटल्या घेवून जाणार्याला पोलिसांनी पकडले. विनोद विश्वास जाधव (वय 42, रा.वाघेश्वर ता.जावली) असे संशयिताचे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत सहा गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 38 लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 34 प्रमाणे आर्म्स अॅक्ट 3/25, 7/25 अंतर्गत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दिवंगत आईच्या स्मृती जपताना विसापूर, ता. खटाव येथील सावंत कुटुंबीयांनी शाळेला ५१ हजारांची देणगी दिली आहे. त्यांच्या शैक्षणिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे डॉल्बी चालक आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मग साताऱ्यात डॉल्बी का वाजू नये, याचे प्रशासनासह पोलिसांनी उत्तर द्यावे, असा रोखठोक सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केलेल्या शिवसेना जिल्हाध्यक्षपदी पुरुषोत्तम जाधव यांची वर्णी लागली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
श्रध्दा किंवा अंधश्रध्दा तपासताना चिकित्सा करायला हवी. शब्दप्रामाण्य नाकारून बुध्दिच्या, तर्कशास्त्राच्या आधारावर समाजमनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण जर प्रामाणिकपणे पार पाडली आणि विज्ञाननिष्ठ समाज घडवला तर अंधश्रध्दांचे उच्चाटन करता येऊ शकेल, असा विश्वास अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केला.
बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी फलटण तालुक्यातील एकाचा खून केला. शशिकांत बाबासो कारंडे (वय ४७, मूळ रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. एचडीएफसी बॅंकेमागे, भिगवण रोड बारामती) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.