बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी फलटण तालुक्यातील एकाचा खून केला. शशिकांत बाबासो कारंडे (वय ४७, मूळ रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. एचडीएफसी बॅंकेमागे, भिगवण रोड बारामती) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
सातारा : बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी फलटण तालुक्यातील एकाचा खून केला. शशिकांत बाबासो कारंडे (वय ४७, मूळ रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. एचडीएफसी बॅंकेमागे, भिगवण रोड बारामती) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
शहरातील श्रीरामनगर भागातील कवी मोरोपंत शाळेजवळ गुरुवारी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. कारंडे यांचा मृतदेह सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात तणावाचे वातावऱण आहे. कारंडे हे त्यांच्या नातवाला नेण्यासाठी कविवर्य मोरोपंत शाळेजवळ आले होते. या दरम्यान काहींनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कारंडे हे बारामती लघु औद्योगिक कंपनीत एका पाईप कंपनीत नोकरीला होते. दरम्यान कारंडे यांच्या मुलाची यापूर्वी भांडणे झाली होती. त्या वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिला नाही. पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.


