कास परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई होणार का ? नेहमीप्रमाणे नोटीसच का?
कास परिसरातील अनाधिकृत बांधकामांना तहसीलदार आशा होळकर यांच्या नोटीसा
गत जिल्हाधिकारी श्री. दलाल यांना कारवाई करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. परंतु, आज अखेर नोटीसा व्यतरिक्त कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून करण्याचे धाडस झाले नाही. कास परिसरातील ३१ मालमत्तांचा विषय न्याय प्रविष्ट असून इतर १२४ मालमत्तांवर सातारा तहसिलदार यांनी नेहमीप्रमाणे ५२-५३ अंतर्गत सात दिवसात बांधकाम काढले नाही तर सातारा जिल्हा प्रशासन स्वतःहून अतिक्रमण काढणार व झालेला सर्व खर्च बोजा म्हणून मिळकतीवर चढवणार आशाप्रकारचा नोटिस सातारा तहसिलदार आशा होळकर यांनी दिला आहे.
कास परिसर हे जागतिक वारसा असलेले स्थळ असून या भागात दुर्मिळ, विविध नैसर्गिक संपतीने व्यापलेला असून अशा या कास परिसरामध्ये अनेक व्यवसायिकांनी कोणतीही शासकिय परवागीशिवाय बांधकामे करण्यात आली असून यासंदर्भात ‘साहस वार्ता’ ने ‘कास झाले भकास’, ‘कास चा रोड शो’ या शिर्षकांखाली आवाज उठवला होता. गत जिल्हाधिकारी श्री. दलाल यांना कारवाई करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. परंतु, आज अखेर नोटीसा व्यतरिक्त कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून करण्याचे धाडस झाले नाही. कास परिसरातील ३१ मालमत्तांचा विषय न्याय प्रविष्ट असून इतर १२४ मालमत्तांवर सातारा तहसिलदार यांनी नेहमीप्रमाणे ५२-५३ अंतर्गत सात दिवसात बांधकाम काढले नाही तर सातारा जिल्हा प्रशासन स्वतःहून अतिक्रमण काढणार व झालेला सर्व खर्च बोजा म्हणून मिळकतीवर चढवणार आशाप्रकारचा नोटिस सातारा तहसिलदार आशा होळकर यांनी दिला आहे.
कास परिसरातील अनाधिकृत बांधकाम बहुतांशी बलाढ्य लोकांची असल्यामुळे या बांधकामावर गांधारीच्या भूमिकेतील प्रशासन आता बुलडोझर फिरणार का? याकडे पर्यावरण प्रेमिंचे लक्ष आहे.
कास परिसरातील अनाधिकृत
बांधकाम केलेल्या लोकांची यादी
महेंद्र शिवाजी सुळके, निलेश दिलीप माने, सोमनाथ राजाराम जाधव, कन्हैयालाल भवरलाल पुरोहित, दिनेश शिवाजीराव जाधव, संजय पुरुषोत्तम कासट, रणजीत नंदकिशोर राठी, साधना प्रवीण कुलकर्णी, राजेंद्र सुभाष बागल, चारुदत्त सुभाष बागल, संदीप गजानन शोत्री, मोहिनीबाई मांगीलाल नावंधर, रोहन सुशांत नावंधर, सीमंतिनी श्रीरंग नुलकर, भागीरथी बबन शेळके, प्रताप शिंदे (स्विय सहायक उदयनराजे भोसले), राजेश महादेव माने, दीपक भागवत जावळे, राजेश नंदकुमार भुतकर, महेंद्र मनसुखलाल शहा, बाबुलाल राजाराम भामरे, कुणाल किशोर घोडके, सीमा अविनाश पवार, राजदीप एकनाथ माजगाव, लीलाचंद तेजाजी बाफना, अपर्णा अविनाश बाचल, नीलकंठ परशुराम तपासे, स्मिता शशिकांत पाटकर, इंद्रायणी प्रदीप जाधव, नीलिमा मदन भोसले (माजी आमदार यांच्या पत्नी), शकील अब्दुल सय्यद, संगीता घनश्याम माने, बाबासाहेब शिवाजीराव कदम, स्वरदा शिरीष चिटणीस, महेश सुरेश लोया, फारूक नरिमन कुपर (प्रसिद्ध उद्योजक), शंकर राजाराम जाधव, संपत राजाराम जाधव, सारिका संपत जाधव, दिलीप महादेव उंबरकर, बाबुराव शामराव कार्वे, श्रीकृष्ण रामचंद्र उंबरकर, शंकर मुकुंद गणपतराव पवार, गुलाबराव गेनू भनगे, राजेंद्र ज्ञानदेव कारवे, रामदास शंकर कारवे, दत्तात्रय तुकाराम भाणगे, आत्माराम गंगाधर भणगे, लक्ष्मीबाई खाशाबा उंबरकर, बाबुराव गणू उंबरकर, मानसिंग यशवंत पवार, रोहिदास बाबुराव सपकाळ, सूर्यकांत ज्ञानदेव कारवे, संपत तुकाराम मोरे, रामचंद्र किसन मोरे, अंकुश विठ्ठल मोरे, शांताबाई नारायण मोरे, नितीन गणपत मोरे, प्रसन्न रविंद्र गडकरी, कृष्णा रामचंद्र माने, संतोष सहदेव आटाळे, जगु चंगू माने, नामदेव शंकर जाधव, अजित मारुती माने, संपत राजाराम जाधव, संपत गणपत जांभळे, जयवंत मनोहर ठोके, धनंजय विश्वासराव जाधव, शैलेश प्रभाकर इनामदार, मनोज नारायण देशमाने, जालिंदर श्रीरंग शिंदे, रमेश चंद्रशेखर कब्बूर, प्रताप सिंह लक्ष्मण राजेमहाडिक, संयोगिता अमर काकडे, सुनील राजेश पवार, लक्ष्मण जगन्नाथ शिंदे, रमेश अनिल उबाळे, संयोगिता अमर काकडे, सुनील राजेश पवार, वैशाली प्रमोद टगसाळे, बाळकृष्ण कोंडीबा शेडगे, धनाजी बळवंत शिंदे, निलेश व अतुल अरुण बारटक्के, वामन महादेव उंबरकर, मधुकर तुकाराम पाटेकर, रणजीत शंकरराव मोरे, मीना शिवाजी शेडगे, श्रीपती चंद्र माने, योजना राजेंद्र बोबडे, शुभांगी अनिल पाटील, सहजराम नारायणदास छाबडा, श्रीरंग धोंडीराम गोगावले, अशोक साहेबराव कदम, लक्ष्मण गणपत कदम, मंगेश विठ्ठल वाडेकर, सुधीर रामचंद्र साळुंखे, जितेंद्र विश्वनाथ भोसले, अमित प्रताप सिंह देशमुख, स्मिता सचिन पाठक, रणजीत शंकरराव मोरे, सीमा अविनाश पवार, जालिंदर काळू उंबरकर, अतुल प्रभाकर घोडके, लक्ष्मण गणपत कदम, सविता यशवंत साळुंखे, संतोष वामन पवार, राजेंद्र रघुनाथ बोबडे, मनीषा नंदकुमार नलावडे, प्रेम लता हरिनारायण कासट, किसन सखाराम मोरे, विशाल उद्धव कदम, अमर कोंडीबा अटळे, जहागीर खान अहमद खान, संपत राजाराम जाधव, विनीत किरण साबळे, घनश्याम नारायणदास छाबडा, बापूराव हरी अटाळे, फिरोज हबीब खान पठाण (स्विय सहायक शिवेंद्रसिंहराजे), वैशाली प्रमोद टांगसाळे, जालिंदर श्रीरंग शिंदे, प्रताप राजे महाडिक, प्रिया महेश शिंदे, विक्रम लालासाहेब पवार, अलका हिंदुराव शिंदे, वैभव कुंडलिक फरांदे, अविनाश मल्हारराव काकडे.
कास परिसामध्ये होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाबद्दल वेळोवेळी प्रसार माध्यमे तसेच पर्यावरण प्रेमीनी आवाज उठवला होता. प्रत्येक वेळी प्रशासनाने महसुलाची कमतरता भासली की या परिसरातील व्यवसायिकांवर नोटिसा काढून कारवाईची धमकी देण्यात येत आहे परंतु, आज अखेर व्यवसायिकांवर नोटिसा व्यतरिक्त कोणतीही कारवाई झालेली नाही. आज तहसिलदार आशा होळकर यांनी काढलेली नोटीस ही कारवाई करण्यासाठी आहे का? महसूल वाढविण्याच्या हेतूची आहे. हे आपल्याला नजिकाच्या काळात समजून येईलच. वास्तवामध्ये बांधकामे होत असतांनाच अशी कारवाई का झाली नाही.
आता पर्यत महसूल प्रशासनाने कित्येक नोटीसा दिल्या त्यावर शून्य कारवाई, महसूल कमी पडला की कारवाई नोटीस ही पद्धत बंद झाली पाहिजे, यापुर्वी बजाविलेल्या नोटीस वर कोणतीही कायदेशीर कारवाई न करणार्या अधिकारी, कर्मचारी यांचेवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी.
-महारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार
(संस्थापक अध्यक्ष राज्य युवा फाउंडेशन महाराष्ट्र)


