सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांत होणार आहे.
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांत होणार आहे.
जिल्हयाच्या कृषी व ग्रामीण विकासाची प्रमुख अर्थवाहिनी असणार्या या बँकेने नाबार्ड, महाराष्ट्र शासन, नॅफस्कॉब, राज्य बँक, महारास्ट्र स्टेट को. ऑप बँक्स असोसिएशन तसेच देशातील इतर सहकारी संस्थांकडून विविध 100 हून अधिक पुरस्काराने बँकेस गौरविणेत आले आहे. नुकतेच नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय सहकार मंत्रालयामार्फत ग्रामीण सहकारी बँकांची राष्ट्रीय परिषदेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ’एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल’ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे शुभ हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करणेत आला. सन 2021-22 या आर्थिक वर्षात बँकेला उच्चांकी करपूर्व ढोबळ नफा 163 कोटी 69 लाख तर सर्व तरतूदीनंतर निव्वळ नफा रु. 67 कोटी इतका झालेला आहे. बँकेबद्दल जनतेमध्ये असलेली प्रचंड विश्वासाहर्ता व बँकेची उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेच्या ठेवींत भरघोस वाढ झाली असून बँकेने मार्च 2022 अखेर रु. 9122 कोटी इतक्या ठेवींची मजल गाठली आहे. बँकेची कर्जवसुली विक्रमी असून निव्वळ एन. पी. ए चे प्रमाण ’शून्य’ टक्के आहे. गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्य यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी ग्रामीण विकासाच्या अनेक नवनवीन योजना बँकेने राबविल्या असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात बँकेचे मोलाचे योगदान आहे. अहवाल सालात झालेल्या नफ्यातून बँकेने कर्जदार शेतकरी सभासद, विकास सेवा सोसायटया, सचिव, इत्यादिसाठी भरीव तरतूद केलेली आहे. सातारा जिल्हा बँक, बँकींग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे. मागील वर्षात जिल्हयाच्या ग्रामीण भागात कोरोना आजाराने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करणेसाठी रु 3.00 कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. सातारा येथे नव्याने सुरु झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी रक्कम रु. 15 लाखाची मदत केलेली आहे.
बँकेची ऑडीट अ’ वर्गाची परंपरा कायम राखली आहे. गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे बँकेस आय. एस. ओ. 9001:2015 मानांकन प्राप्त झाले असून बँक युपीआय सर्व्हरला लिंक झालेने ग्राहकांना फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, ई-कॉमर्स इत्यादि सर्व व्यवहार घरबसल्या काही क्षणात करता येणार आहेत. गुगल पे, फोनपे,पेटीएम, ऍमेझोन या प्रकारचे ऍप्लीकेशनद्वारे मोठया प्रमाणात जलद डिजीटल व्यवहार करता येतील. राज्यातच नव्हे तर देशपातळीवर नामांकित अशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा लौकिक सर्वत्र झाला आहे.
अशा लौकिक प्राप्त बँकेच्या 72 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेच्या सर्व सभासदांनी शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांत उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, नितिन जाधव पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.


