maharashtra

दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील : जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी


दिव्यांग हा समाजातील वंचित घटक असून सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच प्रशासकीय बैठक आयोजित करून दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही सातारचे नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिव्यांग बांधवांशी बोलताना दिली.

सातारा : दिव्यांग हा समाजातील वंचित घटक असून सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच प्रशासकीय बैठक आयोजित करून दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही सातारचे नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिव्यांग बांधवांशी बोलताना दिली.
तत्कालीन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर रुचेश जयवंशी यांनी कार्यभार स्विकारला आहे. यानिमित्ताने दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी जयवंशी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषद सुरु असताना दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बसून होते. पत्रकार परिषद संपताच ना. देसाई हे आपल्या गाडीकडे जात असताना त्यांना दिव्यांग बांधव दिसले. त्यांनी दिव्यांग बांधवांच्या जवळ जात त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि नवीन स्थापन झालेले युतीचे सरकार दिव्यांगांच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास दिला.
ना. शंभूराज देसाई गेल्यानंतर दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी दालनाकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी रूचेश जशवंशी यांचे स्वागत करण्यातआले. तसेच दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या नूतन जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. या समस्यांवर जिल्हाधिकारी यांनी सखोल चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, दिव्यांग हा समाजातील वंचित घटक असून सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच प्रशासकीय बैठक आयोजित करून दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष शैलेंद्र बोर्डे, गणेश किर्दत उपस्थित होते.