भारतीय जवानाच्या लग्नात रक्तदान शिबिर घेऊन हर्ष फाउंडेशनने वेगळ्या पद्धतीने केला स्वातंत्र्य दिन साजरा
15 ऑगस्ट या अमृत महोत्सवी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जवान नवनाथ पवार यांनी आपली अर्धांगिनी सुमन यांच्याशी विवाह कार्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
पुसेगाव : 15 ऑगस्ट या अमृत महोत्सवी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जवान नवनाथ पवार यांनी आपली अर्धांगिनी सुमन यांच्याशी विवाह कार्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
सौ.गुणाबाई भिकाजी व भिकाजी रामचंद्र पवार यांचे चिरंजीव नवनाथ यांचे आणि सौ.कांताबाई बाळासाहेब वबाळासाहेब बाबुराव पाचंगे ता.शिरुर जि.पुणे यांची कन्या सुमन यांच्याशी सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी सुखकर्ता लॉन्स, रांजणगाव येथे लग्न झाले.
नवनाथ पवार हे शिवकार्यामध्ये अग्रेसर असणारी राजे शिवछत्रपती परिवार या संस्थेचे सेवक आहेत. राजा शिवछत्रपती परिवार ही शिव कार्यामध्ये गड किल्ले संवर्धन आणि गरजू लोकांना मदत हे ध्येय असणारी संस्था आहे. श्री राजा शिवछत्रपती परिवार याचे सर्व पदाधिकारी सेवक लग्नासाठी हजर होते. नवनाथ पवार हे पुणे मधील आहेत आणि भारतीय लष्करामध्ये देशसेवा बजावत आहेत. आपले लग्नकार्य हे अनोख्या पद्धतीने साजरे व्हावे, ही संकल्पना दोन्ही पती-पत्नीची होती. 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देश अमृत महोत्सव साजरा करत असल्यामुळे त्याचे निमित्त साधून दोघा पती-पत्नीने आपल्या भव्य लग्न कार्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. या रक्तदान शिबिरासाठी हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले. वधू-वरांनी स्वतः रक्तदान करून तसेच वर्हाडी मंडळ यांनी रक्तदान करून आशीर्वाद देण्यात आले.