सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी दारु अड्डयावर छापा टाकून २ हजार ५२० रुपये किमतीची दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
प्रत्येक गावाने ठरवले तर त्याचे स्मार्ट व्हिलेज मध्ये रूपांतर होऊ शकते. ग्राम विकासाची पंचसूत्री जर आपण राबवली तर आपले गाव निश्चित स्मार्ट होईल, असे पाटोदा (औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी निढळ ता खटाव येथील फ्रेंडस प्रतिष्ठान येथील दुर्गा उत्सवा निमित्ताने झालेल्या विशेष व्याख्यानामध्ये सांगितले.
आमचे ढोल वाजवायचे सोडा, पण सातारकरांनी तुमचा ढोल जो चांगलाच बडवला आहे त्याचा विचार करा. सातारकरांच्या नावाखाली वेड पांघरुन पेडगांवला जाणारे किती दिडशहाणे आहेत, हे सातारकरांना आता समजुन चुकले आहे, असा घणाघात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी टिकाकारांवर नाव न घेता केला.
सातारा ते कोरेगाव रस्त्यावर खावली गावनजिक स्कूल बसने अचानक पेट घेतला होता. मात्र, ही बाब बसचालकाच्या लक्षातही आली नव्हती. तो विद्यार्थ्यांना घेवून गाडी चालवत निघालाच होता. सुदैवाने सातारा पोलीस दलातील एक कर्मचारी डयुटी संपवून दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. त्यांना बसमधून धूर येत असल्याचे दिसल्यानंतर मग पोलीस कर्मचाऱ्याने स्कूल बसचालकाला बस थांबवण्यास सांगितले आणि क्षणाचाही विलंब न करता बसमधील विद्यार्थी शालेय साहित्यासह बाहेर काढले.
शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत एका झाडाखाली महेंद्र उर्फ महेश बजरंग बोराटे रा. करंजे पेठ, सातारा, मेहताब उर्फ साहिल जब्बार शेख रा. केसरकर पेठ, सातारा आणि यासीन इकबाल शेख रा. शनिवार पेठ, सातारा हे तीन जण जुगार खेळताना आढळून आले.
नुकसान व चोरी केल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू असताना सातारा येथील एका देवीच्या मंदिरातून एका महिलेचे अज्ञात चोरट्याने ६७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील राधिका रोडवर असणाऱ्या नंदादीप हॉस्पिटल समोरून अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
अंगापुर, ता. सातारा येथून एक अल्पवयीन मुलगी दि. २१ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली. ती अद्याप परत घरी आली नाही.
अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.