अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० सप्टेंबर रोजी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाजवळ दिलीप पंढरीनाथ मुळीक रा. नागझरी, ता. कोरेगाव हे आपले मित्र अतुल धोंडीराम मुळीक यांच्या समवेत दुचाकीवरून सातारा येथून रहिमतपूर कडे जात असताना अचानक एक भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अतुल मुळीक हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दिलीप मुळीक यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला.


