maharashtra

नुकसान व चोरी प्रकरणी तीन जणांवर गुन्हा


नुकसान व चोरी केल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : नुकसान व चोरी केल्याप्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ सप्टेंबर रोजी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सेव्हन स्टार मल्टिप्लेक्स इमारतीच्या पार्किंगमध्ये मंगेश दत्तात्रय चव्हाण, गणेश चंद्रकांत काटे, संजय धनाजी भोसले सर्व रा. सातारा यांनी महेंद्र बाबुराव चव्हाण वय ७०, रा. सदरबझार, सातारा हे त्यांच्या मालकीचे कव्हर्ड पार्किंग फुकट वापरायला देत नाहीत म्हणून पार्किंगच्या गेटचे कुलूप तोडून अनधिकृतपणे आज प्रवेश केला. तसेच टॉयलेट, बाथरूममध्ये तोडफोड करून नुकसान केले. पार्किंगमध्ये राखीव असलेली १० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.