maharashtra

पंचसूत्री राबबल्यास गावाचे रुपांतर स्मार्ट व्हिलेज मध्ये नक्की होईल : भास्करराव पेरे-पाटील


प्रत्येक गावाने ठरवले तर त्याचे स्मार्ट व्हिलेज मध्ये रूपांतर होऊ शकते. ग्राम विकासाची पंचसूत्री जर आपण राबवली तर आपले गाव निश्चित स्मार्ट होईल, असे पाटोदा (औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी निढळ ता खटाव येथील फ्रेंडस प्रतिष्ठान येथील दुर्गा उत्सवा निमित्ताने झालेल्या विशेष व्याख्यानामध्ये सांगितले.

पुसेगाव : प्रत्येक गावाने ठरवले तर त्याचे स्मार्ट व्हिलेज मध्ये रूपांतर होऊ शकते. ग्राम विकासाची पंचसूत्री जर आपण राबवली तर आपले गाव निश्चित स्मार्ट होईल, असे पाटोदा (औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी निढळ ता खटाव येथील फ्रेंडस प्रतिष्ठान येथील दुर्गा उत्सवा निमित्ताने झालेल्या विशेष व्याख्यानामध्ये सांगितले.
ते पुढे म्हणाले, गावची पंचसूत्री म्हणजे गावातील सर्वाना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. स्वच्छ पाणी मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येकाने स्वच्छ पाणी प्यायला हवे. अनेक आजार केवळ अस्वच्छ पाणी पिल्यामुळे होत आहेत. दुसरे सूत्र म्हणजे गावात फळझाडे लावायला हवीत. गावात रस्त्याच्या दुतर्फा फळझाडे लावायला हवे. तिसरे सूत्र गावात जास्तीत जास्त स्वच्छता ठेवा. जितके गाव स्वच्छ राहील तितके आजारपण गावातून निघून जातील. माणसे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल. अस्वच्छतेमूळे मच्छर व रोगजंतूची वाढ होते व त्यातून गावात अनेक रोगांची साथ येतें. केवळ गाव परिसर स्वच्छ ठेवला तरी अनेक आजार दूर होतील.
चौथे सूत्र गावातील मुलांना चांगले शिक्षण द्या. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्या गावाची आर्थिक स्थिती बदलायची असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही. पाचवे सूत्र गावातील वृद्ध व्यक्ती ची काळजी घ्या. वृद्ध व्यक्तीना आदर सन्मान द्या. त्याना गावातील विकासकामात सहभागी करून घ्या. वृद्धांची काळजी घेतल्यास वृद्धाश्रम काढण्याची वेळ येणार नाही. या प्रकारे ही विकासाची पंचसूत्री मी प्रत्येक गावाला देत असतो. माझे पाटोदा गाव हे या सूत्रानुसार विकास करत आहे.
निढळ मधील फ्रेडस प्रतिष्ठान या मंडळाने दुर्गा उत्सवाला चांगल्या वक्त्यांची व्याख्याने ठेवून एक आदर्श निर्माण केला आहे. समाजाला शिक्षित करण्यासाठी व्याख्यान हे उत्तम माध्यम आहे. फ्रेडस प्रतिष्ठान असेंच विधायक कार्यक्रम करून समाजाची देशाची सेवा करावी. या मंडळातील अनेक सदस्य भारतीय सेना दलात सेवा करत आहेत. ही मंडळे ही गावातील संस्कार पीठे निर्माण व्हावी. त्यानीं फ़्रेंडस प्रतिष्ठान च्या व्याख्यान मालेच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रतिष्ठान मधील सदस्य व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.