Satara

esahas.com

पत्नीला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा

सातारा पोलिस दलात कर्तव्य बजावत असलेले पोलिस हवालदार आबा बाबूराव काळे (वय 34, रा.गोळीबार मैदान, सातारा) यांनी पत्नीला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेतो, असे म्हणून धमकी दिली.

esahas.com

कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

सातारा शहरालगत महामार्गावर कंटेनरची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात विनोद बबन भोसले (वय 38, रा. तांबे रेवडे ता.कोरेगाव) हे ठार झाले.

esahas.com

एकाचा मृतदेह आढळला

नवीन एमआयडीसी, सातारा परिसरातील खासगी मराठी शाळेच्या आवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दि.१ रोजी किशोर शंकर चव्हाण रा. लांजा, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी यांचा मृतदेह आढळुन आला.

esahas.com

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप

कटगुण (ता. खटाव) येथील किशोर प्रल्हादराव विधाते यांच्या फार्महाऊसवर त्यांची आई श्रीमती सुमन प्रल्हादराव विधाते यांचा खून करणाऱ्या मध्यप्रदेशातील सुनीलकुमार गणपत गौड (वय ३०) याला वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

esahas.com

शिरगाव येथे विजेचा शॉक लागून दोन मुलांचा मृत्यू

शिरगाव तालुका वाई गावच्या हद्दीत विजेचा शॉक बसून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शिरगाववर शोककळा पसरली आहे. या घटनेतून तीन मुले सुदैवाने बचावली आहेत.

esahas.com

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, एक ठार, तर दोन किरकोळ जखमी

कोल्हापूर येथील देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या कार चालकाला उलटी व मळमळल्यागत होत असल्याने, त्याने कार महामार्गालगत बाजूला घेतली. त्याचवेळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू, तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.

esahas.com

‘मास मॅरेथॉन-2022’ने औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचारी व नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली

औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचारी व नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मास मॅरेथॉन-2022’चे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. ही मॅरेथॉन महाराष्ट्रातील माईल स्टोन ठरेल, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी काढले.

esahas.com

कोरेगाव व माण विधानसभा मतदारसंघ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम : प्रताप जाधव

कोरेगाव व माण विधानसभा मतदारसंघ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभा असून दोन्ही विधानसभा मतदारसंघातून बहुसंख्येने शिवसैनिक दसरा मेळव्याला शिवतीर्थावर उपस्थित राहणार आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनिर्वाचीत जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केले.

esahas.com

घरफोडी, चोरी प्रकरणातील एका संशयितास अटक

घरफोडी, चोरी प्रकरणी एका संशयित इसमाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अभिषेक गणेश आवारे वय ३०, रा. गेंडामळ सातारा असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

esahas.com

फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

तीन टक्के व्याजाने पैसे देऊन पैसे परत घेण्यास टाळाटाळ करून जमीन नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद, ता. फलटण येथील दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.