maharashtra

फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


तीन टक्के व्याजाने पैसे देऊन पैसे परत घेण्यास टाळाटाळ करून जमीन नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद, ता. फलटण येथील दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : तीन टक्के व्याजाने पैसे देऊन पैसे परत घेण्यास टाळाटाळ करून जमीन नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद, ता. फलटण येथील दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी महेंद्र लक्ष्मण अहिवळे वय ५२ रा. सासवड, ता. फलटण यांनी त्यांचे मेहुणे रवींद्र काशिनाथ काकडे रा. निरा, ता. पुरंदर यांच्या वैयक्तिक कामासाठी विकास प्रमोद ननावरे, अमित रामचंद्र मोरे दोघेही रा. लोणंद यांच्याकडून तीन टक्के व्याजदराने दीड वर्षासाठी १० लाख रुपये घेतले. अहिवळे पैसे देण्यासाठी गेले असता दोघांनीही पैसे घेण्यास टाळटा करून त्यांची जमीन फसवणुकीने लुबाडल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.