maharashtra

‘मास मॅरेथॉन-2022’ने औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचारी व नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे गौरवोद्गार; 1900 धावपटूंनी पूर्ण केली रन

औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचारी व नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मास मॅरेथॉन-2022’चे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. ही मॅरेथॉन महाराष्ट्रातील माईल स्टोन ठरेल, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी काढले.

सातारा : औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचारी व नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मास मॅरेथॉन-2022’चे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. ही मॅरेथॉन महाराष्ट्रातील माईल स्टोन ठरेल, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी काढले.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच औद्योगिक अधिकारी, कामगार, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या ‘मास मॅरेथॉन-2022’ला उदंड प्रतिसाद मिळाला. रनर्सच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमध्येही कुठेही कमतरता भासली नाही. ‘मास’ची सर्व टीम या ‘मास मॅरेथॉन-2022’साठी दिवस-रात्र झटली. त्याचाच परिपाक म्हणून आज पार पडलेली ‘मास मॅरेथॉन-2022’ही महाराष्ट्रात माईल स्टोन ठरली आहे.
संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आरोग्यम धनसंपदा मानवी जीवनामध्ये आरोग्याएवढी कोणतीच गोष्ट महत्वाची नाही. ज्या राष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य चांगले ते राष्ट्र बलशाली सर्वांगीण प्रगतीपथावर वाटचाल करणारे राष्ट्र संबोधिले जाते. आपल्या आर्युवेदामध्ये शारीरिक व्यायामास अनन्य साधारण महत्व दिले आहे, हे आपण जाणतोच. आजच्या धावपळीच्या जगामध्ये शरीर स्वास्थ उत्तम असणे, ही गरजेची बाब झाली आहे. औद्योगिककरणामध्ये घड्याळाच्या काट्यावर सर्व व्यवहार होत आहेत.
सर्व शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांसाठी धावणे हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची गरज नाही आणि ते कुठेही, कधीही आपल्यासाठी सोयीचे आहे. धावणे किंवा जॉगिंग हा सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो.
या सर्व गोष्टींचा विचार करून आणि आपल्या भारत देशातील लोकांच्या गौरवशाली इतिहासासाठी, संस्कृतीसाठी आणि कर्तृत्वासाठी स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असल्याने सातारा जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी एक अत्यावश्यक भूमिका असलेल्या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) मार्फत 11 किमी आणि 05 किमी धावण्याच्या अंतरासह 02 ऑक्टोबर 2022 रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या लोकांमध्ये फिटनेस जागरूकता आणि सशक्तीकरण निर्माण करणे आणि जागतिक तापमानवाढीपासून पर्यावरण संरक्षण करणे, हा या मॅरथॉन स्पर्धेचा मुख्य उद्देश्य आहे.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) आयोजित व टॉप गिअर ट्रान्समिशन प्रायोजित सहप्रायोजित जोशी जम्प्ला प्रा.लि. व उत्कर्ष ट्रान्समिशन प्रा.लि. यांच्या सहकार्याने मास मॅरथॉन स्पर्धा आज, दिनांक 02 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 06 वाजता सातारा औद्योगिक क्षेत्र (नवीन चखऊउ) येथे संपन्न झाली. मास मॅरेथॉन-2022 स्पर्धेमध्ये सुमारे 1900 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने उद्योजक, कामगार-कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, विशेषत: महिला व विदयार्थी यांचा सहभाग जास्त होता.  
तसेच मॅरेथॉन धावपटू करीता आवश्यक असलेली वैद्यकीय सुविधाकरीता समर्थ हॉस्पिटल, अतिरिक्त एमआयडीसी सातारा यांचे सहकार्याने मॅरेथॉन धावपटू करीता लागणारी वैद्यकीय सुविधा यामध्ये ऍम्ब्यूलन्स, मेडीसीन स्टॉक, ग्ल्युकोज पावडर, बँडेज, डॉक्टर्स, नर्स स्टाफ इ. सेवा सदर ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या  होत्या.
स्पर्धेचा शुभारंभ राजेंद्र गावडे, अधीक्षक अभियंता, चखऊउ, पुणे, मास अध्यक्ष राजेंद्र मोहिते, श्रीकांत पवार, दिलीप उटकुर, भालचंद्र जोशी, मास उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, मास स्पोर्ट कमिटी चेअरमन श्रीकांत तोडकर व अनुप मुथा यांनी झेंडा दाखवून केले.
सदर स्पर्धेमध्ये विजेते स्पर्धेकांचे बक्षीस वितरण अजयकुमार बन्सल (भा.पो.से) जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा यांचे हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेत पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक  - शिवम कापले, व्दितीय - धीरज डांगे, तृतीय - राजेश सावंत.
महिला गटामध्ये - प्रथम क्रमांक - स्मिता शिंदे, व्दितीय कमांक - शैलेजा पाटणकर, तृतीय क्रमांक - दिव्या इथापे
यावेळी सातारा जिल्ह्यातील आर्यनमॅन डॉ. प्रमोद कुचेकर,  हेमल उपाध्याय, अनुप मुथा व डॉ. सुचित्रा काटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यकम प्रसंगी मास माजी अध्यक्ष युवराज पवार, शिरीष खुटाळे, उदय देशमुख हे उपस्थित होते.
 मास मॅरथॉन - 2022 स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मासचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, सदस्य यांनी बहुमुल्य सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा जोशी यांनी केले व आभार श्रीकांत तोडकर यांनी मानले.