maharashtra

शिरगाव येथे विजेचा शॉक लागून दोन मुलांचा मृत्यू


Two children died due to electric shock in Shirgaon
शिरगाव तालुका वाई गावच्या हद्दीत विजेचा शॉक बसून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शिरगाववर शोककळा पसरली आहे. या घटनेतून तीन मुले सुदैवाने बचावली आहेत.

भुईंज : शिरगाव तालुका वाई गावच्या हद्दीत विजेचा शॉक बसून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शिरगाववर शोककळा पसरली आहे. या घटनेतून तीन मुले सुदैवाने बचावली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी शिरगाव गावच्या हद्दीत कुंभारखाणी शिवारात वाघाचा मळा येथून तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची लघुदाबाची विजेची लाईन गेली आहे. ती तुटून कोड्याच्या वाहत्या पाण्यात पडली होती. त्या ओढ्यातून शेळ्यांना चारा आणण्यासाठी जात असणाऱ्या साहिल लक्ष्मण जाधव वय ९ आणि प्रतिक संजय जाधव वय १५ या दोघांना विजेचा शॉक लागला. ही बाब समजतात या दोघांनाही तातडीने भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून पुढे सातारा येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना नेण्यात आले मात्र त्या दोघांचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा तात्काळ भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, निवास मोरे, शिवाजी तोडरमल, बापूसाहेब धायगुडे, आनंदराव भोसले, विजयराव देशमुख, शंकर घाडगे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.