नवीन एमआयडीसी, सातारा परिसरातील खासगी मराठी शाळेच्या आवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दि.१ रोजी किशोर शंकर चव्हाण रा. लांजा, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी यांचा मृतदेह आढळुन आला.
सातारा : नवीन एमआयडीसी, सातारा परिसरातील खासगी मराठी शाळेच्या आवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दि.१ रोजी किशोर शंकर चव्हाण रा. लांजा, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी यांचा मृतदेह आढळुन आला.
चव्हाण हे येथील एमआयडीसीमध्ये कामाला असल्याने ते कोडोली परिसरात राहण्यास होते. याप्रकरणी कोडोली गावचे पोलीस पाटील राजेंद्र शंकर भोईटे रा. कोडोली,सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस अमंलदार व्ही. व्ही. शिंदे या करत आहेत.


